अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-   राज्यात कोरोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन व प्रशासनाकडून सर्वोतोपरीत दक्षता घेतली जात आहे.(maharashtra omicron cases)

राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे.

राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे.

राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे.

मुंबईत पुन्हा 8000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजरा 82 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली आहे राज्यासह मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे आणि 11 वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील.दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा सुरु राहाणार आहेत. मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.