Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डला आग लागून अकरा जणांचा मृत्यू कारणीभूत असलेल्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत रात्री उशिरा तोफखाना पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता लागलेल्या आगीनंतर दिवसभर याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे फिर्याद दाखल करणे बाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

अखेर पोलिसांनी वाट पाहून स्वतः गिर्याद देत या घटने बाबतचा गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 304(अ) नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे मात्र एवढी मोठी घटना घडूनही जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने गुन्हा दाखल करण्या बाबत कोणतीही तसदी घेतली नाही