file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- रोहित शर्मा टीम इंडियाच्या टी-२० आणि वन डे टीमचा लवकरच कॅप्टन होणार आहे. निवड समितीच्या बैठकीत लवकरच यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

स्पोर्ट्सच्या एका वेबसाईटने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीकडे टस्ट कसोटीची कॅप्टन्सी असेल, अशीही माहिती आहे.

तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कॅप्टन असतील, या वृत्ताचे बीसीसीसीआयने खंडन केले आहे. वर्ल्ड कपनंतर टी-२०ची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय आधीच विराटने घेतला हे.

याबाबतचे पत्रही त्याने बीसीसीआयला पाठविले आहे. याबाबत सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये विराटने तिन्ही फॉरमॅटच्या कॅप्टन्सीमुळे वर्कलोड असल्याचे सांगितले होते.

अशा स्थितीत वन डे आणि टेस्ट मॅचेसची कॅप्टन्सीवर लक्ष देण्यासाठी टी-२० कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने जाहीर केले आहे.

एक बॅट्समन म्हणून तो टी-२० च्या मैदानावर दिसेल.टी-२० वर्ल्डकपनंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये न्यूझीलंड टीम भारतात येणार आहे.

यात ३ टी-२० आणि २ स्ट मॅचची सीरिज होणार आहे. १७ नोव्हेंबरला जय़पूरमध्ये पहिली टी-२० होईल, त्यानंतर २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत टेस्ट सीरिज होणार आहे.