file photo

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे.

त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या प्रकृती चांगली असल्याने काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

सद्य परिस्थिती बहुतांश राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे .

चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या.

या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचं सांगून स्टेज वरच सहकाऱ्यांसमवेत जेवण केलं होत. आता त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी टेस्ट करून घ्यावी तसेच काळजी घ्या, असं ट्वीट त्यांनी त्यावेळी केलं होतं.