अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.(Indian cricketer)

केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीत समस्या आहे, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.

विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता

तर मालिकेतील शेवटचा सामना हा १०० वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा 99 वा सामना असेल.