Big Diwali Sale : Flipkart Big Diwali Sale 2022 मध्ये, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्तात विकली जात आहेत. तुम्हालाही दिवाळी सेलमध्ये नवीन टीव्ही हवा असेल पण बजेट कमी असेल तर ही एक उत्तम संधी आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या बिग दिवाळी सेल 2022 मध्ये Xiaomi Mi 5A HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही 12000 रुपयांपेक्षा कमी सवलतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Mi 5A 32-इंच मॉडेल फ्लिपकार्टवर 12,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. तुम्ही हा टीव्ही SBI क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड EMI व्यवहाराद्वारे घेतल्यास या टीव्हीवर 10 टक्के सूट मिळेल. याशिवाय, 4333 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवरही टीव्हीचा लाभ घेता येईल.

Mi 5A 32-इंच HD रेडी LED स्मार्ट Android TV Android TV OS सह येतो. 32-इंचाचा टीव्ही HD रेडी 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. या टीव्हीमध्ये 20 वॅटचे स्पीकर आहेत. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे.

शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने हॉटस्टार, यूट्यूब यांसारख्या अॅपसह येतो. हे स्मार्ट टीव्ही बेझल-लेस मेटल बिल्डसह येतात. टीव्हीमध्ये दिलेला 20W साउंड आउटपुट डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. ब्लूटूथ 5.0, ड्युअल-बँड वाय-फाय आणि HDMI 2.0 सारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये टीव्हीमध्ये उपलब्ध आहेत.