file photo

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. बुधवारच्या तुलनेत केवळ 25 टक्के कांदा शनिवारी मार्केटमध्ये आला.

बुधवारी जवळपास 40 हजार गोण्या आवक झाली होती. शनिवारी केवळ 62 वाहनांमधून 11 हजार 262 गोण्या कांदा विक्रीसाठी आला. उन्हाळी मालाला जास्तीत जास्त 3 हजारापर्यंत तर नवीन मालाला 2500 रुपयांपर्यंत भाव मिंळाला.

घोडेगाव मार्केटमध्ये कांदा आवक अचानक घटल्याने जास्तीत जास्त भावात 500 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवारी जास्तीत जास्त 2500 पर्यंत भाव होता.

शनिवारी 3 हजारापर्यंत भाव निघाले. उन्हाळी मोठ्या मालाला 2500 ते 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मालाला 1800 ते 1900 रुपये, गोल्टी कांद्याला 1000 ते 1600 रुपये, गोल्टा कांद्याला 1500 ते 2000 रुपये,

जोड कांद्याला 300 ते 400 रुपये भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 2800 ते 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. नवीन मालाला 500 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.