file photo

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाचे भाव वधारण्याची शक्यता आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सहन करत राहणार, हेदेखील पहावे लागेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.89 रुपये आहे. तर डिझेल 90.17 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.

आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 102.47 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर आहे.

आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 107.95 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 97.84 रुपये प्रति लिटर आहे.

आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 99.58 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 94.74 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.