अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.(Aditya Thackeray)

बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे.

34 वर्षीय व्यक्तीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे.

आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या आदित्य यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले.

त्यांनी ते घेतले नाहीत. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तांत्रिकदृष्ट्या तपास केला आणि आरोपी बंगळुरू येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बंगळुरू येथे गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली.