अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- नगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये (ICU) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये चार महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी महसूल विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अंतर्गत खालील सदस्यांसह समिती स्थापन करण्यात आली आहे.

1. Div com नाशिक – अध्यक्ष

2. DHS कार्यालय मुंबईतील Jt संचालक रुग्णालय

3. HEMR (आरोग्य उपकरणे देखभाल) साठी dhs मध्ये सहाय्यक संचालक

4. संचालक अग्निसुरक्षा मुंबईचे प्रतिनिधी

5. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे प्रतिनिधी

६. अहमदनगर महानगरपालिकेचे प्रतिनिधी (अग्निसुरक्षा अधिकारी)

7. DHS द्वारे नियुक्त केलेला एक चिकित्सक

8. उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ – सदस्य सचिव

वरील प्रमाणे आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी आता सर्व बाबींचा तपास करून अहवाल सादर करणार आहे.