अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- परिसरात पिस्तूलाचा धाक दाखवून बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा लुटण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावांमधील बँक ऑफ महाराष्ट्र

या बँकेत आजदुपारच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहेत. असे आहे दरोडेखोरांचे वर्णन वय २५- ३० वर्ष,५ ते ६ इसम, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले सदर गाडीतून आरोपी नगर दिशेला पळून गेले आहेत.