File Photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गाडेकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीयेथे भेट देऊन कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला.

बेलवंडी गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असल्याने बेलवंडी गाव बंद करण्याचा निर्णय प्रशासननाने घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान कोरोनाच्या पार्शवभूमीवर विभागीय आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.

त्यावेळी त्यांनी काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या होत्या. यामध्ये ज्या गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत अशी गावे लॉकडाऊन करावीत, जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.

असे आदेश प्रशासनाला नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते. त्यानुसार श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गाव सह कोळगाव, मढेवडगाव,काष्टी, हंगेवाडी, येळपणे,लोनिव्यंकनाथ ही गावे 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.

असे बंद किती दिवस ठेवणार? संतप्त व्यापाऱ्यांचा सवाल…

बेलवंडी येथील व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी या बंदला तीव्र विरोध केला होता. असे बंद किती दिवस ठेवणार आहेत, दुकानदारांना कर्जाचे हप्ते, भाडे, लाईट बिल या गोष्टी बंद मुळे भागत नाहीत. अशी मागणी व्यापाऱ्यांनी गाडेकर यांच्याकडे केली आहे.