Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Monsoon) उघडीप दिली आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून (Monsoon News) परतला असल्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे.

यामुळे राज्यात सध्या शेती कामाला वेग आला आहे. दिवाळी सण असून देखील शेतकरी बांधव बांधावर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण करीत आहेत. दरम्यान शेतकरी बांधवांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी बांधव परिवारासमवेत हार्वेस्टिंगची कामे करत असल्याचे चित्र आहे.

सध्या शेतकरी बांधव व रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी देखील पुढे सरसावला आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी बांधव बी बियाणांची तसेच खतांची पूर्तता करण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं नाव अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात सध्या पावसाची उघडीप आहे.

पावसाची उघडीप असल्याने शेतकरी बांधवांनी शेतीकामे करून घ्यावीत. तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे देखील उरकून घ्यावीत. कारण की या महिन्याच्या शेवटी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवली आहे.

पंजाब राव यांच्या मते या महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 ऑक्टोबरच्या आसपास राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप असतांना आपली शेतीची कामे करून घेणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आता राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.

म्हणजे रब्बी हंगामासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार होत आहे. निश्चितच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने रब्बी हंगामाकडे शेतकरी बांधव खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई काढण्यासाठी वळणार आहे.

सध्या राज्यात पावसाची उघडीप असून दिवाळी सणासाठी लगबग सुरू आहे. मात्र या महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे निश्चितच काढण्यासाठी आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.