अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीचा सणोत्सव अवघ्या एका दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हंटली कि आतिषबाजी होणारच हे ठरलेले आहे. मात्र फटाक्यांचा बार उडण्याआधीच पोलिसांनी नागरिकांना एक महत्वाचा इशारा दिला आहे.
यामध्ये रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे.

नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी शहरात 33 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. नागपुर पोलिसांनी पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे.
याबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ग्रीन फटाक्यांची खरेदी-विक्री करता येणार आहे. ग्रीन फटाकेच फोडण्याची परवानगी आहे.
फटाके विक्रेत्यांच्या संघटनेसोबत आमची बैठक झालेली आहे. त्यांना नियमाविरुद्ध फटाक्यांची विक्री न करण्याचं आवाहन केलेलं आहे.
दरम्यान नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारने लोकांना केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम