file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राज्यात नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केलेली आहे.

मात्र, या अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ शकणार नाही. याच कारणामुळे हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.