Maharashtra news : महाविकास आघाडीतील नाराज असलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे,

त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे कि ”आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”

एकनाथ शिंदेंसह एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेना आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड का पुकारले याचे महत्वाचे कारण समोर येत आहे. एकनाथ शिंदेंसोबत थोडे थोडके नव्हे तर ३५ आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांनी आपली भूमिका ठरविल्याचेही समजते आहे.

एकनाथ शिंदे यांनी रातोरात दोन गटांमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार गुजरातच्या सुरतला हलविले. यासाठी सुरतचे ली मेरिडिअन हॉटेलही बुक करण्यात आले होते. एवढी तयारी काही रातोरात झालेली नव्हती. तर शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे

एकनाथ शिंदे नाराज आमदारांसह गुजरातमधील हॉटेलमध्ये आहेत. भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून अमित शहा जे पी नड्डा यांच्या घरी, महाराष्ट्रातल्या राजकारणात भुकंप होण्याची शक्यता आहे.

मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या कुणाच्याही संपर्कात नाहीत. ते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट राणेंनी केलं आहे.

एकनाथ शिंदे नाराज का ?

  1. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे सर्वात मोठे मंत्री आहेत. परंतू त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अदित्य ठाकरे यांना झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
  2. महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असूनदेखील त्यांच्याऐवजी अदित्य ठाकरे यांना जास्त अधिकार असल्याने आपल्याला डावलले जात असल्याची भावना शिंदे यांची आहे.
  3. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाचा तिजोरीसारखा वापर करण्यात येतो. परंतू पक्षाच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्याने शिंदे नाराज आहेत.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची टीम शिंदे यांच्या घराबाहेर दाखल झाली आहे.

दरम्यान, नाराज एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये आहेत. त्यामुळेच ठाण्यातल्या त्यांच्या लुईस वाडी परिसरातल्या बंगल्याजवळ पूर्णपणे शुकशुकाट आहे. तरीही खबरदारी म्हणून स्थानिक पोलिसांनी घराबाहेर पहारा वाढवला आहे.

ठाण्यातील अनेक जुने शिवसैनिक व शिवसेना समर्थक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी दिसून येत आहेत. अनेक शिवसेना पदाधिकारी यांची सोशल मीडिया वर पोस्ट करुन एकनाथ शिंदेना समर्थन दिले आहे. साहेब बोलतील तो आदेश अशा आशयाचे पोस्ट व्हायरल होत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंशी संपर्क झाल्याचा दावा राऊत यांनी केलाय. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत हे राऊत यांनी मान्य केले आहे.