सर्वात मोठी बातमी : राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी जाहीर!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

या काळात शाळांकडून सुरु असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. गायकवाड यांनी ट्विटरवरुन दिवाळी सुट्टीची माहिती दिली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरु झाल्या आहेत.

राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सावासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.

त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना 28 ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे.

या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!