file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड समोर मद्यधुंद इसमाने नाशिक वरून नगरला जाणाऱ्या बसची समोरील काच फोडल्याची घटना घडली आहे.

आज दुपारी ३ वाजता राहुरी फॅक्टरी येथे नाशिक येथून निघालेली बस नगरला जात असताना अचानक रस्त्यावर एक मद्यधुंद इसमाने त्या बसला आडव होत काचेला दगड मारले.

या मध्ये बसच्या काचेचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर बस चालक व वाहक यांनी राहुरी पोलीस ठाण्यास सदर माहिती दिली. त्यानंतर पोलीस हेडकोन्स्टेबल गर्जे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.