अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना झाल्याचे दुपारी उघडकीस आले. त्यानंतर आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना झाल्याची माहिती हाती आली आहे.(maharashtra politiciens)(corona)

पाटील यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. यात गंभीर बाब म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा 28 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडला.

या लग्नसोहळ्याला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांना कोरोनाची लागणी झाल्यानं आता या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणाले, ‘सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी, ही विनंती.’ त्यामुळे अंकिता पाटील यांच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या सर्व नेत्यांची चिंता वाढली आहे.