पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-  काल देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले.

आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल?

की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का? असा संतप्त सवाल करतानाच 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं, असं राऊत म्हणाले.

केंद्र सरकारने अत्यंत किरकोळ दरवाढ कमी केली आहे. ही एक प्रकारे नागरिकांची चेष्टाच आहे. या सरकारकडे मोठं मन नाही. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार?

असा सवाल करतानाच पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते.

100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?, असा सवाल राऊत यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!