अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- प्रलंबित मागण्यासाठी एसटी कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. आता या आंदोलनात भाजपाने देशील उडी मारली आहे.

याच प्रश्नावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयसमोर आंदोलनाची हाक दिली आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कामगारांच्या संपावर कुठलाही तोडगा निघताना दिसत नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचा मनाई आदेश धुडकावून कामगारांनी संप सुरू ठेवला आहे. त्यामुळं लोकांचे हाल होत आहेत. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष भाजपनं सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे.

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी भाजपनं येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.