मालवणजवळ बोट उलटली, २० जण पाण्यात…

Published on -

Maharashtra news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. यामध्ये २० जण पाण्यात पडले असून त्यापैकी दोघे बुडाले आहेत. अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.


समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन ही बोट गेली होती. ती परत येताना किनाऱ्याजवळ समुद्रात उलटली. बोटीत २० जण होते. यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे.


सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जय गजानन ही बोट २० जणांना घेऊन ही बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. तेथून परत येताना हा अपघात झाला. सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला.

आकाश देशमुख (रा. अकोला) आणि स्वप्नील पिसे (रा.पुणे) अशी मृतांची नावे आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. मात्र, बोट कशी उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!