अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2021 :- Boat ने आपले नवीन बजेट स्मार्टवॉच Boat Watch Xplorer O2 भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने बिल्ड इन GPS, SpO2 मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, वॉटर रेझिस्टन्स, मल्टिपल स्पोर्ट्स ट्रॅकिंग आणि इतर वैशिष्ट्यांसह नवीनतम Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच सादर केले आहे.(Boat Watch Xplorer O2 )

Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच सध्या भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून 3000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉचच्या सर्व फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल जाणून घ्या.

Boat Watch Xplorer O2: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :- Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉचमध्ये 1.3-इंचाचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले चौरस आकाराचा आहे, ज्याचे रिझोल्यूशन 240 x 240 पिक्सेल आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर हे घड्याळ सुमारे 10 दिवसांचा बॅकअप देते. या घड्याळात मॅग्नेटिक चार्जर देण्यात आला आहे.

हे धावणे, चालणे, सायकलिंग, हायकिंग, क्लाइंबिंग, फिटनेस, ट्रेडमिल, योग आणि डायनॅमिक सायकलिंग यासह अनेक क्रीडा मोड्सचा मागोवा घेऊ शकते. यासोबतच Boat Watch Xplorer O2 वॉचमध्ये हार्ड रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर देण्यात आला आहे.

यासोबतच Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच जीपीएससह सादर करण्यात आले आहे. Boat Watch Xplorer O2 हे बिल्ड इन GPS सह बाजारातील सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. यासोबतच Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉचमध्ये कॉल आणि मेसेज अलर्ट, मॅन्युअल सायकल ट्रॅकिंग, व्हायब्रेशन अलर्ट, रिमाइंडर आणि अलार्म सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच Android (v4.4 आणि वरील) आणि iOS (v8.0 आणि वरील) चालणार्‍या उपकरणांशी कनेक्ट केले जाऊ शकते.

Boat Watch Xplorer O2 किंमत :- Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच भारतात फक्त 2,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रे आणि ऑरेंज कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.