अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर ऍट्रॉसिटीसह रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास विद्यालयातील विद्यार्थी मित्राचा वाढदिवस विद्यालयाच्या मोकळ्या जागेत साजरा करीत होते.

अगोदरच्या कारणावरून आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादीला अपमानास्पद वागणुक देत रँगिंग केली. तसेच धक्काबुक्की केली.या प्रकरणी फिर्यादीने दि.27 रोजी रात्री 11 वाजता आपल्या कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोपरगाव ग्रामीण पोलीसानी या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 2015 कलम तसेच ,रॅगिंग ऍक्ट 1999 चे कलम 4 व भादवी कलम 294,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एका आरोपील अटक केली आहे

तर एक आरोपी फरार आहे.सदर अटक केलेल्या आरोपीला 28 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.