अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- मुंबईहुन परभणीकडे केमिकलची २६ टन पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकचे ब्रेक पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे फेल झाल्याने हा ट्रक एका धोकादायक वळणावर जाऊन उलटला.

या अपघातात ट्रक चालक हनुमंत तोंडे व हरीश मुंडे (राहणार माजलगाव) हे या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, ट्रक चालक हनुमंत तोंडे व हरीश मुंडे हे केमिकल पावडरने भरलेला ट्रक मुंबईहुन परभणीकडे घेणं चालले होते.

अचानक या ट्रकचे ब्रेक करंजी घाटात नादुरुस्त झाले. यावेळी ट्रक एका धोकादायक वळणावर जाऊन उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील केमिकलच्या पावडरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केमिकलची पावडर आहे हात लावू नका असे आव्हान अपघातग्रस्त ट्रक चालकाकडून प्रवाशांना करण्यात येत होते तरी देखील अनेक प्रवाशांना ही पिवळसर पावडर हातात घेवून पाहण्याचा मोह सोडला नाही.

नवरात्रोस्तव निमित्त मोहटा देवीच्या दर्शनाससाठी जाणाऱ्या भाविकांची रस्त्याने मोठी गर्दी असल्यामुळे अपघातग्रस्त ट्रकला पाहण्यासाठी व ट्रॅक्टरचे फोटो काढण्यासाठी अनेक प्रवासी या ठिकाणी वाहने बाजूला उभे करून थांबत असल्याने घाटात दिवसभर वाहतूक कोंडी होत होती.