अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षाच्या बालिकेसह नवघर गल्लीतील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले.
शहरातील कंटेन्मेंट भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षीय बालिका व नवघर गल्ली येथील ३२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
बालिका बाधित रुग्णाच्या संपर्कातील असून युवक निमोण गावाच्या बाधिताच्या संपर्कातील असल्याचे समजते. हा तरुण उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, कोरोनाचे लक्षण आढळल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews