१ कोटी ३३ लाखांची फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर: संगमनेर येथील सुकेवाडी भागातील व्यापारी मनोहर दगडू सातपुते यांच्याकडून उत्तर प्रदेश येथील आरोपी अमन राजपूत , मनोहर राजपूत रा . ललई , पोस्टे खेरगड , फिरोजाबाद या दोघांनी वेळोवेळी कांदा माल खरेदी केला.

हा कांदा ट्रकने पाठविण्यात आला . या सर्व कांद्याची रक्कम १ कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपये झाली. हे पैसे मनोहर सातपुते या व्यापाऱ्याने वेळोवेळी फोन करुन संपर्क केला असता आरोपी अमन राजपूत व मनोहर राजपूत या दोघांनी फोन बंद ठेवला व कांदा नेवून त्याची रक्कम  १ कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपये न देता कांदा नेवून फसवणूक केली.

वरीलप्रमाणे कांदा व्यापारी मनोहर दगडू सातपुते यांच्या फिर्यादीवरुन आरोपी परप्रांतीय अमन राजपूत , मनोहर राजपूत या दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24