अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : सोनईतील दहाजणांना कोरोनाची लागण झाल्याने गाव हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडवण्यात आले आहेत.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनईत आलेल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला.
त्याच्या कुटुंबातील २२ जणांपैकी १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात उपाययोजना चालू केल्या. हायरिस्क असलेल्या असलेल्या सुमारे ५० जणांची स्त्राव चाचणी घेण्यात आली आहे.
शुक्रवारी मंत्री गडाख यांनी गावाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी सूर्यवंशी, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्दन सोनवणे उपस्थित होते.
तालुक्यातील जनतेने काळजी घ्यावी. तालुक्यातील, तसेच जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे गडाख म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews