महानगरपालिकेच्या तीन जागांसाठी 11 अर्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर:  जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून महापालिकेच्या तीन जागांसाठी बुधवारी  11 जणांनी अर्ज नेले आहेत. नगरपालिकेसाठी एक जागा असून, त्यासाठी याआधी दोघांनी आणि  बुधवारी  तिघांनी अर्ज नेले आहेत.

जिल्हा परिषदेसाठी अर्थात ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून एक जागा असून, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजी गाडे यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे. ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता.

महापालिकेसाठी अर्थात मोठ्या नागरी निर्वाचन क्षेत्रासाठी तीन जागांवर निवडणूक होत आहे. त्यासाठी नगरसेवक सुभाष लोंढे, अनिल शिंदे, सुप्रिया धनंजय जाधव, मनोज कोतकर, मनोज दुल्लम, आशा कराळे, सोनाली चितळे, उमेश कवडे, श्याम नळकांडे, सुवर्णा जाधव, सुनीता कोतकर या 11 नगरसेवकांनी अर्ज नेले आहेत.

नगरपालिकेसाठी अर्थात लहान नागरी निर्वाचन क्षेत्रासाठी पाच जणांनी अर्ज नेले आहेत. आसाराम खेंडगे, शहाजी खेतमाळीस, रमेश लाडाणे यांनी काल अर्ज नेले तर, गणेश भोस, सूर्यकांत भुजारी यांनी यापूर्वी अर्ज नेले आहेत.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24