अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गुरूवारी ११६ कोरोनाग्रस्तांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.
दरम्यान, २४ तासांत रुग्णसंख्येत १२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ८५२ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४९, खासगी प्रयोगशाळेत ४२ आणि अँटीजेन चाचणीत ३७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ६, जामखेड १, कोपरगाव १५, नगर ग्रामीण ७, पाथर्डी ६, राहता ६, शेवगाव ६, आणि श्रीगोंद्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा ८, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १०, पारनेर ३, पाथर्डी २, राहाता ६, राहुरी ३, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३ आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा १, जामखेड १०, कोपरगाव १, नगर ग्रामीण ८, नेवासे १, पारनेर १, पाथर्डी ३, राहाता ६, श्रीगोंदे ३, आणि श्रीरामपूर ३ रुग्णांचा समावेश आहे.