Ahmadnagar Breaking : शिर्डी शहराजवळ पार पडलेल्या एका विवाह समारंभास उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळीतील १३५ जणांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या व जुलाब सुरू झाल्याने या सर्वांना तातडीने श्री साईसंस्थानच्या साई सुपर स्पेशलिटी व साईबाबा अशा दोन्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींनी खाजगी रुग्णालयातही जाणे पसंत केले.
त्यात दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत विविध वयोगटातील वऱ्हाडींचा समावेश आहे. हे सर्वजण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. कुणाच्या तब्येतीला धोका नाही, असे रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
काल रविवारी दुपारी दोनच्या सुमारास वऱ्हाडी मंडळींनी या समारंभात जेवण केले. त्यात ज्यांनी दुधापासून तयार केलेली रबडी खाल्ली. त्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या आणि जुलाबाचा त्रास सूरू झाला.
सायंकाळी सहा वाजेपासून साईसंस्थानच्या रूग्णालयात या मंडळींना उपचारासाठी दाखल करण्यास सुरवात झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, याबाबत माहिती देताना रुग्णाल वैद्यकीय सहसंचालक डॉ. प्रितम क म्हणाले, सर्वांची तब्येत सुधारत साईसंस्थानचे उपकार्यकारी अभि तुकाराम हुलावळे, प्रांताधि माणिकराव आहेर, पोलीस उपा संदिप मिटके, तहसीलदार अजे आदींनी या सर्वांची विचारपूस त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचार माहिती घेतली.