अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोना माहामारीची तिसरी लाट येऊ घातली.त्याचा लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याचे सांगितले गेले.
दि.24 ते 27 मे या चार दिवसात देवळाली प्रवरा शहरात 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले कोरोना बाधित आढळले असल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असुन त्याचा देवळाली प्रवरात चांगला फटका बसल्याचे बोलले जात आहे.
देवळाली प्रवरा शहरात नगर पालिकेच्या वतीने वार्ड निहाय रँपिड टेस्ट केली जात आहे. कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.शहरात सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा आढळून येत आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेस प्राप्त झालेल्या यादी नुसार दि.24 मे रोजी 1 ते 16 वयोगटातील 8 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
दि.25 मे रोजी 4 ते 14 वयो गटातील 2 लहान मुले दि.26 रोजी 1 ते 16 वयोगटातील 4 लहान मुले दि.27 मे रोजी 15 वर्ष वयोगटातील 1 मुलगा कोरोना बाधित आढळला आहे.
गेल्या चार दिवसात 15 मुले कोराना बाधित आढळल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे. कोविड सेंटर मध्ये लहान बालकांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ञ नसल्याने लहान मुलांच्या पालकांना रुग्णास घेवून शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.
कोविड सेंटर मध्ये बालरोगतज्ञ उपलब्ध करावा अशी मागणी पालक वर्गातुन केली जात आहे.लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घ्यावी. लहान मुलांना गर्दी पासुन लांब ठेवावे.
घरातील आजारी व्यक्ती जवळ लहान मुले जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव होणार आहे.
देवळाली प्रवरात चार दिवसात 15 लहान मुले कोरोबाधित आढळल्याने उपचारासाठी जागा उपलब्ध होईल तेथे रुग्णास दाखल करावे लागत आहे.