अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एका 17 वर्षीय मुलीने विमान चोरण्याचा प्रयत्न केला. ती लपून विमानतळावर गेली आणि लहान विमान उडवून फरार होण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान भिंतीवर धडकवले. सदरील घटना फ्रेस्नो योशिमाइट आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे.
सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून युवती विमानतळावर आली. तिने एका छोट्या विमानाचा ताबा घेतला. विमान उड्डाण करण्यासाठी ती सज्ज झाली. त्या विमानाचं उड्डाण नीट होऊ न शकल्यानं विमान थेट भिंत तोडून एअरपोर्टपरिसरात घुसलं. ही घटना फ्रेस्नो योशिमाइट इंटरनेशनल विमानतळावर घडली आहे.
विमानतळावरील पोलीस प्रमुख ड्र्यू बॅसिंजर यांनी दिलेल्या माहितीनुसार युवतीनं विमानचं इंजिन सुरु केलं होतं. युवतीने लष्करी क्षेत्रापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या व्यावसायिक टर्मिनल्स आणि कुंपणात घुसखोरी केली होती.
विमानतळ पोलिस प्रमुख ड्यू बेसिन्गर यांनी सांगितले की, मुलीने विमानाचे इंजिन चालू केले आणि साखळ्यांनी तयार केलेल्या कुंपणावर धडकली. मुलगी सैन्याच्या भागापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या कुंपणाद्वारे घुसली होती. विमान चोरीच्या संशयावरून मुलीला अटक करण्यात आली आहे.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेआधी या युवतीने इंजिन सुरू केल्यानंतर विमानाने एक राऊंड मारला. विमानतळ आणि फ्रेस्नो पोलीस अधिकाऱ्यांनी 911 नंबरवर माहिती देताना पायलटच्या सीटवर एक युवतीला बसल्याचं पाहिलं होतं. दुर्घटनेनंतर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. विमान चालवणाऱ्या 17 वर्षीय युवतीनं कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.