अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोड तोडणी मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी रुपयांचे थकत वीजबिले जमा झाली आहे.
महावितरणच्या नगर शहर विभागांर्तगत नगर शहर, पारनेर व नगर तालुका असा भाग आहे. नगर शहरातील वीज ग्राहकांकडे ४२ कोटी, पारनेर 11 कोटी 51 लाख आणि नगर तालुक्यात 11 कोटी 68 लाख रुपये थकबाकी आहे.
महावितरण कंपनीने वीज तोडण्याची मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी, पारनेरमधून 4 कोटी 60 लाख तर नगर तालुक्यातून 3 कोटी 36 लाख रुपये वसुली झाली.
नगर शहरालगतच्या ग्रामीण भागातील जेरूर, जखणगाव, अकोळनेर, शेंडी सारख्या 23 गावांतील वीज ग्राहकांकडे 9 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या गावातून फक्त 2 कोटी 88 लाख रुपये वसूल झाले आहेत. वसुलीची आकडेवारी पाहता नगर तालुक्यात सर्वात कमी 3 कोटी 36 लाख रुपये वसूल झाल्याचे दिसते.