अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने यंदा कर्मचाऱ्यांना दिपावली निमित्ताने २३ टक्के पगार वाढ देण्यात आली असल्याची घोषणा ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आज केली.
प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ भेट या कार्यक्रमात राजेंद्र विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. मगरे , ट्रस्ट विश्वस्त सुवर्णा विखे पाटील,
कुलसचिव डॉ संपत वाळुंज , सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते . यावेळी बोलतांना डॉ विखे पाटील यांनी गेली दोन वर्ष कोरोनाच्या कठिण काळात कर्मचाऱ्यांनी अतिक्षय कष्टाने अविरतपणे संकटाचा सामना केला
त्यांची उतराई होण्याची वेळ म्हणुन ट्रस्टच्या विश्वस्तांनी पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या एप्रिल पासुन झालेल्या पगार वाढीचा फरक आपल्या बॅंक खात्यात जमा केला
असल्याचे जाहीर करत पुढील काळात कर्मचाऱ्यांनी चांगले काम करुन संस्थेच्यावतीने जास्तीत जास्त रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलतांना डॉ व्ही. एन. मगरे यांनी पद्मश्री व पद्मभूषण साहेबांचा वारसा आपले कुलपती अतीशय सशक्त पणे संभाळत आहेत.
आजचा कार्यक्रम जरी फराळ भेटीचा असला तरी तो एका अर्थाने व्यवस्थापनाचा आणि कर्मचाऱ्यांच्या गळा भेटीचा कार्यक्रम आहे असे मला वाटते.
आपण करीत असलेले कार्य हे समाजसेवेचे काम आहे. पुढील काळात आपण असेचं चांगले काम करा दिपावली च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन शशि गणेश यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ सुनिल बुलार यांनी केले.