इम्फाळ : मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या घरावर केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) टाकलेल्या धाडीत तीन वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आलेल्या २६.४९ लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर लोकांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकलेला आहे.
याबाबतच्या माहितीनुसार, मणिपूरमधील विकासकामात ३३२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेकडून (सीबीआय) मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर लोकांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात तीन राज्यांत ९ ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत.
यामध्ये सिंह यांच्या घरावर छापा टाकून नोटबंदीच्या पूर्वीच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या २६.४९ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. तसेच त्यांच्या घरातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळून आलेला आहे.
नोटबंदीपूर्वीच्या चलनातून बाहेर काढलेल्या जुन्या नोटा ठेवणे कायद्याने गुन्हा आहे आणि ओकराम इबोबी सिंह यांच्याकडे आढळून आलेल्या रकमेच्या पाचपटीने दंड आकारला जाऊ शकतो. तसेच इबोबी सिंह आणि मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीशी निगडित असलेल्या एका माजी अधिकाऱ्याच्या आयजोल, इम्फाळ आणि गुडगाव येथे छापे मारलेले असल्याचे सीबीआयने म्हटलेले आहे.