अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान सर्वाधिक मृत्यू अहमदनगर शहरात झाले आहे. अहमदनगर शहरातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील मृतांचा आकडा मोठा आहे.
दररोज सरासरी सहा मृत्यू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५० जणांना कोरोना झाला.
त्यातील १७ हजार १७६ रुग्ण कोरोमातून बरे झाले आहे. सध्या ३ हजार ५८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाबाधितांवर उपचार घेण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालयांमधील बेड देखील आधिग्रहित केले आहे. सार्वजनिक सण-उत्सवांवर बंदी घातली. तरी देखील कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे.
तालुकानिहाय मृतांची संख्या पुढीलप्रमाणे :
– अहमदनगर शहर : १२२
– संगमनेर : २७
– राहाता : १०
– पाथर्डी : १०
– नगर तालुका : १७
– श्रीरामपूर : १५
– भिंगार शहर : ११
– नेवासा : ०९
– श्रीगोंदा : १३
– पारनेर : १३
– अकोले : ०३
– राहुरी : १२
– शेवगाव :
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved