अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कन्नूर : केरळच्या पत्रकारांना स्थानबद्घ केल्याच्या निषेधार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कन्नूरजवळच्या पझायनगडी येथे काळे झेंडे दाखवत त्यांची कार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ कार्यकर्त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली.
या कार्यकर्त्यांमध्ये माकपची विद्यार्थी आघाडी ‘स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय)च्या ३ कार्यकर्त्यांचा तर युवक काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या ५ कार्यकर्त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मंगळवारी पझायनगडी येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री माडायीकावू मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्यांची कार रोखण्याचा प्रयत्न करणे तसेच काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी एसएफआय, डीवायएफआय, युवा काँग्रेस व केएसयूच्या २८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
यापैकी ५ जणांना कोठडी ठोठवण्यात आली असून इतर कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.