अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- रस्त्याने पुढे चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून वेगात आलेल्या मोटारसायकलस्वाराने जोराची धडक दिली.

या अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर महिला जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. २४ रोजी) नगर मनमाड रस्त्यावरील नाईक हॉस्पिटलजवळ घडली.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, सचिन भाऊसाहेब कडूस (रा.सारोळा कासार) हे पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असे तिघेजन दुचाकीवरून जात होते.

ते नगर मनमाड रस्त्यावरील नाईक हॉस्पिटलजवळ आले असता. पाठीमागून वेगात आलेल्या (एमएच १६सी.एल.१२६८) या मोटारसालकलस्वाराने कडूस यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या अचानक झालेल्या धडकेने पाठीमागे बसलेल्या कडूस यांच्या पत्नी व पाच वर्षांचा चिमुकला खाली पडले. यात मुलाला जास्त मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तर पत्नी जखमी झाली. याबाबत सचिन कडूस यांनी तोफखाना पोलिसांत (एमएच १६सी.एल.१२६८) या मोटारसायकलच्या अज्ञात चालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24