ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पकडली ७०० पोती सुपारी ! कोणाशी आहे कनेक्शन? वाचा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : सध्या ठिकठिकाणी अवैध धंदे, ड्रग्ज माफिया आदींवर कारवाई जोरात सुरु आहे. राज्यातील काही घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे.

अहमदनगरजवळील वाळुंज येथे शनिवारी पहाटे सव्वाकोटींची सातशे पोती सुपारी जप्त करण्यात आली आहे. ही सुपारी कर्नाटक येथून गुजरातला जात होती.

सुपारीचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून आता या कारवाईमुळे परराज्यातील सुपारी माफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नगर-सोलापूर रोडवरील वाळूज (ता. नगर) फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक राज्यातील सुपारीने भरलेले दोन ट्रक अहमदनगरमार्गे गुजरातला जात आहेत, अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी. डी. मोरे यांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वाळुंज परिसरात सापळा रचला. त्यावेळी दोन ट्रक सोलापूरकडून नगरकडे येताना दिसले.

अधिकाऱ्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला. त्यांत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर त्या ट्रकची तपासणी केली असता त्यात सुपारी होती. 3 सुपारीची मोजदाद करता एकूण ७०० पोती निघाली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात सुपारी कशासाठी नेली जात आहे, याची विचारपूस केली असता चालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

त्यामुळे सुपारीसह ट्रक ताब्यात घेण्यात आले असून, ही सुपारी कोट्यवधी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त बी. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण कुटे, राजेश बडे,

नमुना सहायक प्रकाश अजबे आदींच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office