७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरात रोज दहा ते बारा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित ३२४ पैकी २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

८९ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. तालुक्याच्या तुलनेत नेवासे शहरात रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.

प्राप्त झालेल्या आहवालात खेडले काजळी येथील ६८ वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.

कोरोनाबाधित झालेल्या रुग्ण नेवासे १२, सलाबतपूर २, निंभारी १, सोनई १, खेडले काजळी १, उस्थळ दुमाला १ येथील आहेत. नेवासे तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरी रहा,सुरक्षित रहा, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24