अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील राहणाऱ्या वृद्धाला अस्थिविकार शस्रक्रियेसाठी पुण्याला पाठवले होते.
शस्रक्रियेपूर्वी कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. या वृद्धाला अपघात झाला होता.
त्यामुळे १२ जूनला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुढील शस्रक्रियेसाठी डॉक्टरांनी १४ जूनला पुण्यातील खासगी रुग्णालयात पाठवले.
तेथून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच श्रीरामपुरातील प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
वृद्धास ज्या रुग्णालयात दाखल केले होते,
तेथील चौघे व संपर्कातील दोन नातेवाईक अशा एकूण सहा जणांना नगरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
संबंधित वृद्ध श्रीरामपुरात कोरोनाबाधित झाला की पुण्यात, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews