अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदे कारखाना येथील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईहून श्रीगोंदे शहरात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण पुण्याहून श्रीगोंदे फॅक्टरी येथे २२ मे रोजी आला होता. पुण्यातील घोरपडी परिसरात पत्नी व मुलांसोबत त्याचे वास्तव्यास होते. तो आई-वडील व भावाकडे आला आणि आजारी पडला.
२३ मे रोजी काष्टी ग्रामीण आरोग्य केंद्रात तो गेला. तेथून त्याला श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. खामकर यांना त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी त्या तरुणाला २४ मे रोजी नगरला घशाचा स्राव घेण्यासाठी पाठवले.
२५ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तहसीलदार महेंद्र माळी यानी लगेच तो परिसर सील केला. घरातील व त्या तरुणाच्या संपर्कात असलेली १४ जणांची तपासणी केली.
कोरोनाबाधित तरुणाचा १० महिन्यांचा पुतण्या पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान, कोरोनाबाधित तरुण १० दिवसांत बरा झाला. मुलाची प्रकृतीदेखील ठणठणीत आहे.
मुंबईतून ७० वर्षीय वृद्ध श्रीगोंद्यात आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. जास्त प्रमाणात लक्षणे दिसू लागल्यामुळे डाॅ. खामकर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवून तपासणी केली. अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, न्यूमोनियामुळे त्यांचा २ जूनला रात्री मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews