सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर चोरट्याचा डल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे तर दुसरे संकट घोंघावत आहे. जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे घरफोडी होवून 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त शिक्षक बबन बाबुराव पाठक (वय 71) रा. नेवासाफाटा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील कपाटात ठेवलेली 30 हजाराची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.

जवळच राहणारे संतोष रामराव बनगर यांचे राहते घरी देखील चोरी झाल्याचे समजले आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24