पोलीस कॉलनीतील पंधरा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- शहरातील बोल्हेगाव पोलीस कॉलनीतील पंधरा तरुणांविरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भांडण सोडविण्यास मध्ये पडलेल्यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत तिघे जखमी झाले आहे.

सर्व आरोपी हे बोल्हेगावातील पोलीस कॉलनीतील रहिवासी आहेत. अक्षय महादेव मोरे, आकाश अनिल भट आणि प्रेम अप्पासाहेब नरे अशी जखमी तिघांची नावे आहेत.

बोल्हेगावातील गणेश चौकात गुरूवारी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान ही भांडणे झाली. ओम नरे व अक्षय सप्रे यांचे दत्ता गायकवाड व आकाश कुराडे व त्यांच्यासोबतचे दहा ते पंधरा अनोळखीशी भांडण सुरू होते.

अक्षय मोरे व त्यांच्या मित्रांनी भांडण सोडविण्यासाठी धाव घेतली. भांडण सोडविताना नरे यांची बाजू घेतल्याचा राग आल्याने गायकवाड,

कुराडे व त्यांच्यासोबतच्या तरुणांनी चाकू, लाकडी दांडके व दगडाने मोरे व त्यांच्या मित्रावर हल्ला केला. या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24