अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : प्रशासनाने कोरोनाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभे केले आहेत. परंतु बऱ्याचदा या ठिकाणावरून अनेकदा विविध तक्रारी येत असतात.
अशातच श्रीगोंदे शहरातील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये सुरु केलेल्या कोविड-19 या विभागात दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ठ असल्याची माहिती तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला व एका पत्रकाराला मिळाली.
त्यांनी श्रीगोंदा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात जाऊन त्याचे फेसबुक लाईव्ह केले. याप्रकरणी तेथील एका रुग्णाने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
याप्रकरणी द्विवेदी यांनी श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांना त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे समजते. कोविड रुग्णांची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी आज हा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews