वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. आरोपींनी शिर्डीजवळील रांजणगाव देशमुख येथे महिंद्रा पिकअपचालकाला अडवून लुटमार केली होती.

उमेश तान्हाजी वायदंडे (गणेशनगर), आकाश दीपक गायकवाड (लक्ष्मीनगर, शिर्डी), संदीप दिलीप रजपूत (बाभळेश्वर) व आणखी एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर शेख व दीपक प्रभाकर सावंत यांच्याबरोबर महिंद्रा पिकअपमध्ये डिझेलचे बॅरल घेऊन रांजणगाव देशमुख येथे गेला.

समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या खडी क्रशरला डिझेल देऊन परत संगमनेर कोपरगाव रोडने देर्डे-कोऱ्हाळे येथे येत असताना रांजणगाव परिसरात सबस्टेशनजवळ आरोपींनी त्यांना अडवले.

मारहाण करून धाक दाखवून खाली उतरून त्यांच्याकडील दोन मोबाइल व पिकअप व एटीएम असा एकूण दोन लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला.

पोलिस निरीक्षक दिलीप पवार, शिशिरकुमार देशमुख, गणेश इंगळे, मोहन गाजरे, मनोहर गोसावी, बाळासाहेब मुळीक, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवींद्र कर्डिले, रवींद्र सोनटक्के, भागिनाथ पंचमुख, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, संदीप चव्हाण,

विजय धनेकर, संभाजी कोतकर व सचिन कोळेकर यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. विविध पथकामार्फत हा तपास करण्यात आला. मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24