नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नोएडा :- एका युवतीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी चार जणांना अटकही केली आहे. 

नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणीची एका कंपनीत काम करणाऱ्या रवी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यावेळी रवीने तरुणीला नोकरी मिळवून देण्याचं आश्वसन देखील दिलं.
बुधवारी संध्याकाळी या तरुणाने तरुणीकडे नोकरीसाठी काही कागदपत्रांची विचारणा केली. ती कागदपत्र आपल्याजवळ असल्याचं तिने सांगितल्यानंतर तरुणाने तिला संध्याकाळीच ते सगळे कागदपत्र घेऊन एफएनजी रोड जवळील एका पार्कमध्ये भेटण्यास बोलवलं.
नोकरीच्या आशेने तरुणी देखील फार काही विचार न करता त्या तरुणाला भेटण्यासाठी पार्कमध्ये गेली. जेव्हा तरुणी त्या ठिकाणी पोहचली तेव्हा त्या पार्कमध्ये कुणीच नव्हतं. त्यामुळे तरुण आणि तरुणी हे दोघेही त्याच ठिकाणी बोलत बसले. तेव्हा दोन तरुणी अचानक तिथे आले आणि त्यांनी तरुणीला छेडण्यास सुरुवात केली.
यावेळी दोघांनी युवतीसोबत असलेल्या तरुणाला धमकी देऊन तिथून हाकलून लावलं. त्यानंतर त्या दोन आरोपींनी आपल्या आणखी चार मित्रांना तिथे बोलावलं. त्यानंतर पार्कजवळील एका निर्जन शेतात नेऊन सहाही जणांना या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

जेव्हा तरुणीनीने त्यांना विरोध केला त्यावेळी त्यांनी तिला बेदम मारहाण देखील केली. त्यानंतर साधारण एका तासांनी सर्व आरोपी हे तिथून फरार झाले. या सगळ्या प्रकारानंतर तरुणी ही जवळच्या पोलीस ठाण्यात पोहचली आणि तिने आपल्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार पोलिसात नोंदवली

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24