Ahmednagar breaking : केडगाव देवी मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात महिलांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात दोन महिलांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा व एका महिलेवर चोरी केल्याचा आणि पाच महिलांवर संशयास्पद चोरीच्या उद्देशाने फिरण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अमृता भिमराज काळे (वय २२) वर्ष, रा. समता नगर ), प्रतीक्षा प्रदीप काळे (वय २२ वर्ष, रा. अंबिका कॉलनी, केडगाव), रिना बाळु भोसले (रा. अंबिका नगर, केडगाव), सुनिता चैतराम सोळंखी (वय ३०, रा. शिवाजीनगर, कल्याणरोड),
सुरज श्रीखंड चव्हाण (वय २०, रा. समता नगर केडगाव), कविता अंकल भोसले (वय ३०, रा. भानसहिवरे, ता.नेवासा) शिवकन्या विशाल भोसले (वय १९ वर्षे, रा. भानसहिवरे ता.नेवासा) अशी महिला आरोपींची नावे आहेत.
केडगाव देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही तसेच संमातर पेट्रोलिंगसाठी कोतवाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसरात कोतवाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना काही महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या.
चोरी करणाऱ्या आणि चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या २ टोळ्यातील सात महिलांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला.
अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश इंगळे, पोलीस जवान योगेश भिंगारदिवे, अभय कदम,
अमोल गाडे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, विश्वास गजरे, रवी टकले, सत्यम शिंदे, प्रमोद लाहरे, तानाजी पवार, सोनाली भागवत, स्वाती तोरडमल, पूजा दिक्कत, सविता शेंडगे, गृहरक्षक दलाचे निलेश गजरे, प्रतीक ठोंबरे, सुषमा मोरे, शितल रोकडे यांनी कारवाई केली.