वृत्तसंस्था :- भारत आणि बांग्लादेश या दोन संघांमध्ये होणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याबाबत क्रिडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेचं कारण आहे ‘गुलाबी चेंडू’.
भारतीय संघ आपला पहिला डे नाईट कसोटी सामना बांग्लादेश विरूद्ध खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याबाबत क्रिडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे, कसोटी सामन्यांमध्ये लाल चेंडूचा वापर केला जातो. परंतु, दिवस-रात्र कसोटी सामन्यांसाठी गुलाबी चेंडू वापरण्यात येतो. ही भारतातली पहिली डे नाईट कसोटी आहे.
गुलाबी चेंडूने ‘ डे – नाइट ‘ कसोटी खेळवण्यात येते . या गुलाबी चेंडूचा दर्जा तसेच यामुळे खेळताना होणार परिणाम यामुळे टीम इंडियाने याला सातत्याने विरोध केला.
मात्र सौरभ गांगुलीने बीसीसीआयमध्ये कार्यरत होताच ‘ डे – नाइट ‘ कसोटीला हिरवा कंदील दाखवला.